सेवा निवड मंडळ केंद्राद्वारे सैन्यात अधिकऱ्यांच्या भरतीत कथित भ्रष्टाचार प्रकरणी लेफ्टनंट कर्नल पदावरील ६ अधिकारी आणि इतरांविरोधात सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे. सैन्यातील हवाई दलाच्या कोअरमधील एमसीएसएनए भगवान हे भरती घोटाळ्यातील कथित सूत्रधार आहेत आणि त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने ब्रिगेडीयर (दक्षता) व्ही. के. पुरोहित यांच्या तक्रारीवरून ही कारवाई केली. नवी दिल्लीतील बेस हॉस्पिटलमध्ये रिजेक्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना पास करून देण्यासाठी काही अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याची माहिती २८ फेब्रुवारी २०२१ मिळाल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.
लेफ्टनंट कर्न भगवान हे सध्या अभ्यासाच्या सुट्टीवर आहेत आणि नायब सुभेदार कुलदीप सिंह हे कथित एसएसबी केंद्रांत उमेदवारांकडून लाच मागण्यात सामील असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सीबीआयने सैन्यातील २३ कर्मचारी आणि नागरिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात अधिकाऱ्यांशी संबंधित अनेकांचा समावेश आहे. हा गुन्हा लाच देणं आणि घेण्याच्या आरोपांतर्गत दाखल करण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times