म. टा. प्रतिनिधी

मुंबई: शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांसह एसटी स्थानके आणि सर्वच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ठिकाणी सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे.

वाचा:

कामानिमित्त दैनंदिन प्रवास करणाऱ्यांकडून करोना रोखणाऱ्या नियमांचे पालन होत नाही. मास्क वापरण्याबाबत सरकारकडून वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. तरी देखील प्रवाशांकडून नियमांचे पालन होत नाही. रेल्वे स्थानके, एसटी स्थानके, रिक्षा-टॅक्सी स्टँड अशा सर्वच ठिकाणी स्थिती सारखीच आहे. अशातच अनेक वर्षांपासून रखडलेला कार्यालयीन वेळ बदलाचा प्रस्ताव आजही ‘जैसे थे’ आहे. ‘महापालिकेकडून करोना नियंत्रणात आणण्यासाठी गर्दीच्या रेल्वे स्थानकांत प्रवाशांची थर्मल चाचणी करण्यात येत होती. मात्र ती अचानक बंद करण्यात आली. मूळात शहरांसह संपूर्ण राज्यातच करोना बाधितांची संख्या वाढत असताना ही चाचणी बंद का करण्यात आली’, असा सवाल उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी उपस्थित केला. ‘थर्मल चाचणी बंद झाल्याने प्रवासी निर्धास्त झाले होते. आता पुन्हा केवळ रेल्वे स्थानके नव्हे, तर सर्वच गर्दीच्या ठिकाणी थर्मल चाचणी करण्याकरिता आवश्यक उपाय करणे गरजेचे आहे’, असे देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

लॉकडाउन टाळण्यासाठीच…

लॉकडाउनमधील नुकसान भरून काढणे आणि आर्थिक अडचणीतून बाहेर येणे यासाठी सर्वच क्षेत्रांतील व्यवहार सुरू झाले आहेत. अशातच पुन्हा लॉकडाउन केल्यास उभारी घेत असलेले क्षेत्र डबघाईला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. थर्मल चाचणी, गर्दी विभागणी, मास्क न वापरणाऱ्यांना दंड आणि वेळप्रसंगी कायदेशीर कारवाई या पद्धतीने वचक ठेवावा. थर्मल चाचणी सुरू केल्यास लक्षणे असलेल्या प्रवाशांचे तातडीने विलगीकरण करणे शक्य होईल. संभाव्य करोना रुग्णांवर देखील नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. यामुळे थर्मल चाचणीद्वारे पुन्हा एकदा सर्व रेल्वे स्थानकांवर तपासणी सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here