उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थाजवळील स्फोटके, तसेच मनसुख हिरन मृत्यू प्रकरणातील गुंतागुंत अधिक वाढतच आहे. या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना अटक करण्यात आली असली तरी त्यांच्याकडे तपास असताना केलेली कारवाई संशय निर्माण करणारी आहे. स्फोटक प्रकरणात ‘सीआययू’च्या पथकाने वाझे राहत असलेल्या ठाणे येथील साकेत सोसायटीमधील दोन डीव्हीआर जप्त केले. विशेष म्हणजे मनसुख यांचा मृतदेह ५ मार्चला सापडला आणि २७ फेब्रुवारीला डीव्हीआर का ताब्यात घेण्यात आले? स्फोटके प्रकरणाचा वाझेंच्या घराशी काय संबंध? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वाचा:
अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला अडीच किलो जिलेटिन भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली. त्याच रात्री या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला. वाझे यांच्या ‘सीआययू’च्या पथकाने या प्रकरणात तपास सुरू केला. तपास हाती येताच २७ फेब्रुवारीला वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये हे पथक पोहोचले. तपासाच्या नावाखाली या सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांच्या नावे अर्ज करून सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेजचे रेकॉर्डिंग करणारे दोन डीव्हीआर या पथकाने ताब्यात घेतले. स्फोटके ठेवणारे इनोव्हा कारमधून निघून गेले. मुलुंड टोल नाक्यावरून पुढे ही इनोव्हा कार नेमकी कुठे गेली हे समजले नाही. साकेत सोसायटीदेखील येथून जवळच असल्याने हे डीव्हीआर घेतले असावेत असे म्हटले जात असले तरी याच सोयायटीचे डीव्हीआर का घेतले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे संशयाला जागा निर्माण झाली असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
स्फोटके ठेवण्यात आलेली स्कॉर्पिओ ही ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरन यांच्या मालकीची होती. मनसुख हे वाझे यांच्या परिचयाचे असून ही कार काही दिवस ते वापरत होते. स्फोटक प्रकरणात एकमेव दुवा असलेल्या मनसुख यांचा ५ मार्चला संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेनंतर तपास एटीएसकडे सोपवण्यात आला.
मनसुख यांच्या दुकानातील ‘डीव्हीआर’देखील हस्तगत
इनोव्हा कार वाझे यांच्या सीआययू पथकाची असल्याचे तपासात समोर आले. गाड्यांचे कनेक्शन तपासण्यासाठी वाझे यांच्या सोसायटीमधील सीसीटीव्ही फूटेज आवश्यक असताना त्यांचे डीव्हीआर आधीच कशासाठी जप्त करण्यात आले, याचा शोध घेण्यात येत आहे. सोसायटीबरोबरच मनसुख यांचे दुकान, नंबर प्लेट तयार करणारे यांच्या दुकानातील डीव्हीआरदेखील घेण्यात आले. यामध्ये डेटा आहे की, डिलीट करण्यात आले हे तपासातून स्पष्ट होईल.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times