वाढते करोना रुग्ण आणि लॉकडाउनच्या चर्चेमुळे ३१ मार्चपर्यंत बंद होणार असल्याचे वृत्त समाज माध्यमांवर वेगाने पसरले. मात्र हे वृत्त जुनेच असून असा कोणताही नवा निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
राज्य सरकारकडून वारंवार करोना लॉकडाउन लागू करण्याचे संकेत मिळत असतानाच ३१ मार्चपर्यंत रेल्वेगाड्या बंद होणार असल्याची अफवा समाज माध्यमांवरून वेगाने पसरली. काही वृत्तमाध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध देखील केली. त्यामुळे रेल्वे तिकीटांचे आरक्षण केलेल्यांचे धाबे दणाणले. मात्र ३१ मार्चपर्यंत रेल्वेगाड्या बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. काही समाज माध्यमांवर जुनाच संदेश खोडसाळपणे व्हायरल करण्यात येत आहे. प्रवाशांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये. रेल्वेगाड्यांच्या माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला संपर्क साधावा, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times