जालना: येथील यशवंत सहकारी सूत गिरणीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. आगीत सूतगिरणीचे एक युनिट जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठी जळाल्या आहेत. (Fire At Ginning Mill in )
आगीची माहिती मिळताच येथून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे. ही सहकारी सूतगिरणी सध्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या ताब्यात आहे. आगीत गिरणीचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आगीच्या भयंकर ज्वाळा अंबड शहरातून दिसत आहेत. ही आग नेमकी कशामुळं लागली हे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी तपास सुरू आहे.
आणखी वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times