पुणे: कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रमुख बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला पहाटे पावणे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत मार्केटमधील अंदाजे २५ दुकाने पूर्णपणे जळाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या आठ वाहनांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ( Fire breaks out in Shivaji Maharaj Market in )
वाचा:
ब्रिटिश कालीन छत्रपती शिवाजी मार्केटची वास्तू दोनशे वर्षे जुनी आहे. या मार्केटमध्ये मासे, चिकन विक्रेते आणि भाजीपाला-फळ विक्रेत्यांचे गाळे आहेत. मार्केटमधील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मंजूर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मार्केटमधील १७ मासेविक्रेत्यांचे गाळे आणि आठ चिकन विक्रेत्यांचे गाळे पूर्णपणे जळाले असून, दुकान मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मार्केटचे लाकडी छत, जुनी सागवानी लाकडे बेचिराख झाली आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times