आजच्या सत्रात सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २५ शेअर तेजीत आहेत. ज्यात टायटन, एशियन पेंट्स, डॉ. रेड्डीज लॅब, भारती एअरटेल , सन फार्मा, कोटक बँक, टेक महिंद्रा, रिलायन्स, टीसीएस, आयसीटी एचयूएल या शेअरच्या किमतीत वाढ झाली आहे. तर बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, इंडसइंड बँक आणि ऍक्सिस बँक या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
वित्तीय सेवा क्षेत्रातील चांगल्या शेअरमध्ये आज खरेदीचा ओघ सुरु आहे. बॉण्ड यिल्डमध्ये वाढ झाल्याने सोमवारी बाजारात विक्री झाली होती. मात्र आज बाजार त्यातून सावरला असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर बाजार विश्लेषक व्ही. के विजयकुमार यांनी सांगितले.
सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३९६ अंकांनी वधरला असून तो ५०७९१ अंकावर आहे. तर निफ्टी १०२ अंकांनी वाढला असून ५००३१ अंकावर आहे. बाजार उघडताच सेन्सेक्सने ३०० अंकाची झेप घेतली आणि तो ५०६९५ अंकावर गेला होता. तर निफ्टीने ७७ अंकांची वाढ नोंदवत १५००० अंकांची पातळी ओलांडली होती.
देशात करोनाबाधितांची संख्या वाढल्याने सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली होती. महागाईचा वाढता जोर आणि करोनाचा फैलाव या कारणांनी गुंतवणूकदारांनी सोमवारी बाजारात मोठी विक्री केली आणि पैसे काढून घेतले होते. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला होता. बाजार बंद होताना तो ३९७ अंकांच्या घसरणीसह ५०३९५ अंकावर स्थिरावला होता तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०१ अंकांनी घसरून १४९३० वर बंद झाला.
सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ११०१ कोटीची विक्री केली. तर स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ७४९ कोटीची विक्री केली. सोमवारी अमेरिकन दिसून आली. डाऊ जोन्स निर्देशांक ०.५ टक्क्यांनी तर एस अँड पी इंडेक्स ०.७ टक्क्यांनी वधारला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times