मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थाजवळील स्फोटके, तसेच मृत्यू प्रकरणातील गुंतागुंत अधिक वाढतच आहे. अंबानी यांच्या घराजवळ २२ फेब्रुवारीला रात्री एक स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या प्रकरणी सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर स्कॉर्पिओसोबतच एक इनोव्हा गाडीही असल्याचं समोर आलं होतं. आता या दोन गाड्यांनंतर या प्रकरणात एका तिसऱ्या गाडीची एन्ट्री झाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)या तिसऱ्या गाडीचा कसून तपास करत आहे.

मर्सिडीज कारचा शोध

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओप्रकरणी एनआयएनं पोलीस अधिकारी यांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात अनेक नवीन खुलासे समोर येत आहेत. तर, तपास सुरु असतानाच एनआयएला अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे प्रकरणात एका इनोव्हा कारची माहिती समोर आल्यानंतर आता एका मर्सिडिज कारच्या शोधात एनआयए आहे. या प्रकरणात मर्सिडिज कार ही एक महत्त्वाचा दुवा असल्याचं बोललं जात आहे.

एनआयएकडे सीसीटीव्ही फुटेज

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएला मर्सिडीज कारचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या बाहेरील आहेत. या मर्सिडीजमध्ये मनसुख हिरन बसले होते, असं बोललं जात आहे. सीसीटीव्हीनुसार, मनसुख हिरन कोणाची तरी वाट पाहत होते. त्यानंतर काही वेळानंतर ही मर्सिडीज कार आली आणि त्यात बसून ते निघून गेले. एनआयएला संशय आहे की मनसुख हिरेन बेपत्ता होण्याच्या वेळेतलं हे सीसीटीव्ही फुटेज आहे.

मर्सिडीज मिळाल्यास गुढ उकलणार

त्यादिवशी मनसुख हिरन कोणासोबत गेले होत?, ती मर्सिडिज कार कोणाची होती. याचा तपास एनआयए करत आहे. मर्सिडिज गाडीची तपास लागल्यानंतर अनेक महत्त्वाचे खुलासे होणार आहेत. या प्रकरणात किती जणांचा हात आहे?, हे देखील स्पष्ट होणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here