पुणेः क्वारंटाइन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करणं दिल्लीतील एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. पुण्यातील क्वारंटाइन सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या गजामधून सोमवारी रात्री पळून जायचा प्रयत्न केला होता. मात्र, पळून जाण्याच्या प्रयत्नात तरुणी खिडकीच्या गजामध्येच अडकली होती. अखेर खिडकीचे ग्रील तोडून तीची सुटका करण्यात आली.

पुण्यातील एरंडवणा येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दिल्लीतील १८ वर्षाच्या एका तरुणीला क्वारंटाइन करण्यात आले होतं. मात्र सोमवारी रात्री या तरुणीने क्वारंटाइन सेंटरमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरुणीचा प्रयत्न फसला आणि ती खिडकीच्या ग्रीलमध्येच अडकून बसली. ही घटना समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

हायड्रॉलिक कटरनं कोडले ग्रील

तरुणी खिडकीच्या ग्रिलमध्ये अडकल्याचे कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घाबरलेल्या तरुणीला धीर देत हायड्रॉलिक कटरच्या साहाय्याने खिडकीचे गज तोडून तरुणीची सुखरुप सुटका केली. व तरुणीला महिला सेवा मंडळाच्या व्यावस्थापिकांकडे सोपावण्यात आलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here