नाशिक: यांचा भाजप प्रवेश, शिवसेना-भाजपमध्ये आलेला दुरावा आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आलेले काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सरकार… या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेना व राणे कुटुंबीय पुन्हा आमनेसामने आले आहेत. सचिन वाझे प्रकरणात आमदार यांनी युवा सेनेचे सरचिटणीस वरुण देसाई यांच्यावर व्यक्तिगत आरोप केल्यानं वादाची ठिणगी पडली आहे. नाशिकमध्ये युवा सेनेनं आज राणेंविरोधात तीव्र आंदोलन करून संभाव्य राड्याचे संकेत दिले. (Yuva Sena Protest Against And )

वाचा:

अँटिलिया स्फोटकं प्रकरणात सचिन वाझे यांच्या अटकेनंतर भाजपनं महाविकास आघाडी सरकारला घेरलं आहे. विशेषत: राणे कुटुंबीयांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केल्यानंतर त्यांचे चिरंजीव नीतेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर अनेक आरोप केले होते. वाझे हे सट्टेबाजांकडून पैसे घेतात आणि त्यातील वाटा शिवसेनेच्या नेत्यांना जातो, असा आरोप त्यांनी केला होता. युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांचं नावही त्यांनी घेतलं होतं. वाझे आणि सरदेसाई यांचे संबंध आहेत. त्यांच्यातील संभाषणाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. याशिवाय, नारायण राणे यांचे चिरंजीव माजी खासदार हे ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेनेवर व शिवसेनेच्या नेतृत्वावर जहरी टीका करत असतात. आतापर्यंत शिवसेनेनं राणेंना उत्तर देण्याचं टाळलं होतं. पण नीतेश राणे यांच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे.

नाशिकमध्ये युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी राणे पितापुत्रांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. दोन कुत्र्यांच्या गळ्यात नारायण राणे व नीतेश राणे यांच्या नावाची पाटी बांधून हे कुत्रे भाजपच्या कार्यालयात सोडण्याचा प्रयत्न युवा सैनिकांनी केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना रोखले. राणेंच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. राणे पिता-पुत्र भाजपसाठी कुत्र्याचं काम करीत असल्याचा आरोप युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here