वरुण सरदेसाई यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेत नितेश राणेंच्या आरोपांवर उत्तर दिलं होतं. तसंच, राणेंनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करु, असं त्यांनी म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत शिवसेनेला घेरलं आहे.
‘तपासयंत्रणांनी सचिन वाझे आणि वरुण सरदेसाईंच्या संबंधांचा तपास करावा म्हणून मी माहिती उघड केली. पण तुम्ही तुमच्याकडे असलेली माहिती तपास यंत्रणांकडे पोहोचवाल तर आम्ही तुमच्या विरुद्ध नोटीस काढून तुमच्यावर कोर्टाचा दबाव टाकू, असा धमकवण्याचा प्रयत्न आहे. सरदेसाई वाझेंना ओळखतात की नाही? त्यांच्यासोबत फोनवरुन संभाषण झालंय की नाही? याबद्दल ते पत्रकार परिषदेत काहीच सांगितलं नाही. आमच्या कुटुंबावर खालच्या पातळीचे आरोप केले तर तुमची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू,’ असं राणेंनी म्हटलं आहे.
‘आम्ही ३९ वर्ष बाळासाहेब ठाकरेंची सेवा केली आहे त्यामुळं शिवसेनेची सगळी प्रकरणं आम्हाला माहिती आहेत. आम्हाला तोंड उघडायला लावायचं असेल तर रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल, नंदकुमार चतुर्वेदी असे अनेक विषय बाहेर काढायची तयारी असेल तर पाठवा आम्हाला कायदेशीर नोटीस. त्यामुळं आम्हाला धमकी देऊ नये,’ असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times