सचिन वाझे प्रकरणामुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. सरकारमध्येही मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. तर, या प्रकरणामुळं गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही राजीनामा घेणार असल्याचं बोललं जात होतं, यावरही अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘कोणाला मंत्रीमंडळात ठेवायचं कोणाला काढायचं हे त्या पक्षाचं काम असतं. जे दोषी असतील ज्याच्यापर्यंत ते धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल,’ असं अजित पवार म्हणाले आहेत.
‘महाराष्ट्र सरकार व मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीपासूनच सांगितलं आहे. कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. चौकशीनंतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यात कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि सरकारही तसं अजिबात करणार नाही,’ असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
‘महाविकास आघाडी सररकार शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून इतर मित्रपक्षांना बरोबर घेऊन तयार केलेलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ही चांगलीच असली पाहिजे. कुणालाही पाठीशी घालण्याचं अजिबात काही कारण नाही. दोन्ही तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप हा कुणाचाही असता कामानये हीच आमची, सरकारची भूमिका आहे.’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times