वाचा:
पुण्यात स्वारगेट येथील गणेशकला क्रीडा रंगमच सभागृहात ३० जानेवारीला झालेल्या एल्गार परिषदेत भाषण करताना शर्जीलनं हिंदू समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा तसंच, न्यायव्यवस्था व संसदेचा अनादर करणारी वक्तव्ये केल्याचा आरोप शर्जीलवर आहे. त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, एल्गार परिषदेनंतर तो महाराष्ट्राबाहेर गेला होता. मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना त्यांच्यावर कारवाईचं आश्वासन दिलं होतं. शर्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणारच,’ असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्याच वक्तव्याचा आधार घेत फडणवीसांनी ट्वीटच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला हाणला आहे.
वाचा:
‘आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे शर्जीलवर कारवाई करण्याबदद्दल बोलले होते, प्रत्यक्षात काय झालं? तो येऊन गेला, जबाब देऊन गेला. महाविकास आघाडी सरकारनं प्रत्यक्षात काय केलं,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ‘खरं तर एफआयआर २९५ अ, १५३ अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता. ‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासन तंत्रा’ विरोधात युद्ध पुकारण्यासाठी १२४ अ हे सुद्धा कलम लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात शर्जीला जामीन मिळण्यासाठी मदत केली जात आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार, असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
मूळ तक्रारीत भादंविचे २९५ अ कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावलं जाणारं हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळलं गेलं आणि कलम १५३ अ लावलं गेलं. हे कलम विविध घटकांमध्ये शत्रुत्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागतं,’ याकडंही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times