मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीच्या रात्री स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती. या कारमध्ये जिलेटिनच्या १९ कांड्या आढळून आल्या होत्या. या कारचा मालक मनसुख हिरन यांचा काही दिवसांनी अचानक मृत्यू झाला. भाजपच्या नेत्यांनी यात सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर वाझे यांची मुंबई क्राइम ब्रँचमधून बदली करण्यात आली होती. त्यानंतर हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्यानंतर एनआयएनं १२ तासांच्या मॅरथॉन चौकशीनंतर वाझेंना अटक केली होती. मात्र, सचिन वाझेंनी आपली अटक बेकायदा असल्याची याचिका एनआयए कोर्टात केली होती. त्यावर आज सुनावणी झाली.
वाचाः
सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात तीन अर्ज केले होते. एनआयए कार्यालयात सीसीटीव्ही नाही, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय अटक करता येत नाही व मुलभूत प्रक्रियेचं पालन न केल्यानं अटक कारवाई बेकायदा आहे, असे मुद्दे मांडणारे तीन अर्ज वाझे यांच्यामार्फत एनआयए कोर्टात करण्यात आले होती. मात्र, आज सुनावणीअंती विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळले आहेत.
वाचा:
दरम्यान, वाझेंनी वकिलांना भेटण्यास दिलं जात नसल्याचाही कोर्टात म्हटलं होतं. यावर एनआयए कोर्टानं केवळ चौकशीच्यावेळी वकिलांना दुरून पाहण्याच्या अंतरावर उपस्थित राहण्याची मुभा दिली.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times