असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमानुसार २३ मार्च २०२१ रोजी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तसेच उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० मार्च २०२१ ही असणार आहे. ३१ मार्च रोजी अर्जाची छाननी होणार असून अर्ज मागे घेण्याची तारीख ३ एप्रिल २०२१ ही असणार आहे. तर या पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर या पोटनिवडणुकीचा निकाल २ मे २०२१ रोजी लागणार आहे.
भारत भालके हे पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. त्यांचे २८ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ऑक्टोबर महिन्यात भालकेंना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे देखील झाले होते. मात्र नंतर त्यांची तब्येत ढासळत गेली. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. भालकेंना मूत्रपिंड आणि मधुमेहाचा त्रास होता. उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.
क्लिक करा आणि वाचा-
कोणाला मिळणार उमेदवारी
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादीकडून तिकीट दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बरोबरच संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान औताडे यांना उमेदवारी देण्याच्या भारतीय जनता पक्षात हालचाली सुरू असल्याचे समजते.
क्लिक करा आणि वाचा-
धनगर समाजाला हवे प्रतिनिधित्व
या मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या मोठी आहे. हे लक्षात घेत येथे धनगर समाजाच्या नेत्याला महाविकास आघाडीने किंवा भाजपने उमेदवारी द्यावी, असे प्रयत्न सुरू आहेत. रविवारी होळकरपाडा येथे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील धनगर समाजाची एक महत्वाची बैठकही पार पडली
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times