वाचा:
गेली काही वर्षे मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या मनसेनं आता ट्रॅक बदलला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात अध्यक्ष यांनी पक्षाचा झेंडा बदलतानाच हिंदुत्वाची भूमिका घेतली. त्याची सुरुवात म्हणून त्यांनी मुंबईतील पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. रविवारी दुपारी १२ वाजता गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे.
वाचा:
मनसेनं या मोर्चाची जय्यत तयारी केली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पोस्टर लावून मोर्चात सामील होण्याचं आवाहन केलं गेलं आहे. पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोर भारतीय नाहीत व माझे बांधव नाहीत. त्यांना हाकललंच पाहिजे. त्यासाठी मनसेच्या मोर्चात सामील व्हा, असं आवाहन त्यातून करण्यात आलंय. त्याशिवाय, ‘तुम्ही स्वस्थ बसणार आहात का?, ही लढाई आहे… असं म्हणत मनसेनं ट्विटरवर व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्यात मुंबईतील वाढत्या झोपडपट्ट्या, त्यांना लागणाऱ्या आगी व त्यामागचं वास्तव राज ठाकरे सांगताना दिसत आहेत. हे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यामुळं उद्याच्या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times