मुंबईतही झपाट्याने वाढत आहेत करोना बाधित रुग्ण
मुंबईत आज दिवसभरात १ हजार ९२२ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. हा अकडा दोन हजारांच्या जवळपास जाणारा आहे. तर, मुंबईत आज दिवसभरात एकूण १ हजार २३६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात मुंबईत एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
या मृत झालेल्या ४ रुग्णांना काही जुने आजार होते. मृतांमध्ये २ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. मुंबईत सध्या एकूण १५ हजार २६३ सक्रिय (अॅक्टिव्ह) रुग्ण आहेत. काल सोमवारी मुंबईत १ हजार ७१२ नव्या रुग्णांचे निदान झाले होते. म्हणजेच कालच्या तुलनेत आज २१० रुग्ण अधिक आहेत.
मुंबईतील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९२ टक्के एवढा आहे. ९ मार्च ते १५ मार्चपर्यंत मुंबईत एकूण रुग्णवाढीचा दर ०.४५ टक्के आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५६ दिवसांचा असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
पुण्यातील कोरोना स्थिती
पुण्यात दिवसभरात १ हजार ९२५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर, दिवसभरात एकूण ६७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेचआज दिवसभरात पुण्यात एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी २ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. पुण्यात सध्या ३९४ गंभीर रुग्ण आहेत. पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार २१० एवढी आहे. यातील २ लाख ३ हजार १६ रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर, पुण्यात आतापर्यंत एकूण ४ हजार ९६९ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ६० हजारांवर, ६,६७६ सक्रीय बाधित
जिल्ह्यातील सात, तर जालना जिल्ह्यातील एका बाधिताचा घाटीत मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण करोना बळींची १३५१ झाली आहे. त्याचवेळी पुन्हा मंगळवारी (१६ मार्च) १२७१ नव्या बाधितांचा (शहरः १०११, ग्रामीणः २३९, अँटिजेनः २१) उच्चांक स्पष्ट झाला व त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ६०,१०० पर्यंत पोहोचली आहे. तसेच मंगळवारी जिल्ह्यात ३८४ बाधित हे करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या ५२,०७३ झाली आहे व सध्या ६,६७६ बाधितांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times