मुंबई: पश्चिम उपनगरातील गोरेगाव पूर्व (Goregaon East) येथे एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग (Severe Fire) लागली. या आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचेही वृत्त आहे. ही भीषण आग आज, मंगळवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास लागली. ही आग विझवण्याचे अग्नीशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. (severe fire broke out in goregaon in mumbai and rabale in navi mumbai)

या आगीची दखल राजकीय नेत्यांनीही घेतली असून काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. निरुपम यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हणतात, ‘गोरेगाव पूर्वेला असलेल्या रत्नागिरी हॉटेलाच्या मागे भयंकर आग लागली आहे. अग्निशमन दलाचे बंब पोहोचले आहेत. यानंतर तपास होईल. खात्रीने तिथे बेकायदेशीर कामे चालत असण्याचे पुरावे सापडतील. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची त्यात हातमिळवणी असल्याचे स्पष्ट होईल. कोणतीही कारवाई होणार नाही. यानंतर आणखी कुठे आग लागेल. त्यानंतर पुन्हा चौकशीचे तमाशा होईल.’

क्लिक करा आणि वाचा-

नवी मुंबईतही आग
नवी मुंबईतील रबाळे () येथील एमआयडीसीमधील डब्ल्यू-४६, एएसव्ही मल्टी कंपनीत देखील मोठी आग लागली. अग्निशमन दलाचे ७ बंब घटनास्थळी दाखल झाले. ही आग तीन तासांनंतरही धुमसत होती. येथील कंपन्यांमध्ये क्रूड ऑइल आणि ग्रीसचा मोठा साठा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आग विझवण्यात मोठी अडचण येत असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

क्लिक करा आणि वाचा-

या आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यात यश यावे यासाठी वाशी, एमआयडीसी, ऐरोली, बेलापूरमधून अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. या आगीत ३ कामगार अडकून पडले होते. मात्र, सुरुवातीलाच तेथील स्थानिक लोकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळेच या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here