मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने यांना अटक केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत राहिलेले वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असली तरी वाझेंच्या अटकेमुळे आणखीही काही अधिकाऱ्यांना झटका बसण्याची चिन्हे आहेत. खुद्द मुख्यमंत्री यांनी हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतले असून वर्षा निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बैठकांचे सत्र सुरू होते. ( )

वाचा:

सचिन वाझे यांची अटक हा मुंबई पोलीस दलासाठी खूप मोठा हादरा असून मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न यानिमित्तान उपस्थित झाला आहे. त्यामुळेच मुंबई पोलिसांच्या लौकिकाला कुठेही धक्का लागू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: मैदानात उतरल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे विविध स्तरावर चर्चा करत असून बुधवारी दिवसभरात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

वाचा:

मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत उच्चस्तरिय बैठक घेतली. गृहमंत्री , राज्याचे पोलीस महासंचालक , मुंबईचे पोलीस आयुक्त हे या बैठकीला उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर साडेबारा वाजताच्या सुमारास हे सर्व जण वर्षा येथून निघाले. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील मात्र मिळू शकला नाही.

वाचा:

दरम्यान, सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी सकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात मुंबई पोलीस दलाची धुरा वाहत असलेले आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि त्यांच्याजागी १९८९च्या बॅचचे आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांच्याकडे ही धुरा दिली जाऊ शकते अशी एक शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. फणसाळकर हे सध्या ठाण्याचे पोलीस आयुक्त आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here