आज आंदोलनाचा ५ वा दिवस आहे. मात्र राज्य शासनाने अजूनही मच्छिमारांची मागणी मान्य केलेली नाही. यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होणार असून त्याचे परिणाम राज्य शासनाला भोगावे लागतील, असा इशारा तांडेल यांनी दिला आहे.
राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू यांनी या आंदोलनाची दखल घेऊन मत्स्यव्यवसाय आयुक्तांना मंत्रालयात बैठकीसाठी बोलावले. परंतु आयुक्तांनी सदर बैठकीतून पळ काढून उपायुक्त युवराज चौगुले यांना या बैठकीला पाठविले, या बैठकीत उपायुक्तांनी घुमजाव करण्याचा प्रयत्न केला, असे तांडेल म्हणाले. या बैठकीत उपायुक्त म्हणाले की ईईझेडमध्ये मासेमारी करतात. हे क्षेत्र केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. यामुळे महाराष्ट्र शासन या क्षेत्रात कोणतीही कारवाई करू शकत नाही. मात्र ते हे आम्हाला लेखी लिहून द्यायला तयार नाहीत असे तांडेल यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
एक तर सागरी मासेमारी अधिनियम १९८१ (कलम १४) आणि कलम १५(१) अंतर्गत बोटींना अवरुद्ध बेकायदेशीर मच्छिमारांवर कारवाई करा किंवा जर तसे होत नसेल तर आम्हाला ते लेखी स्वरुपात द्या, अशी मागणी तांडेल यांनी केली. पण यावर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे उत्तर त्याच्याकडे नसल्याचे तांडेल म्हणाले.
मात्र, मच्छिमार कृती समितीची मागणी योग्य असून यावरील तुमचे म्हणणे त्यांना येत्या दोन दिवसांत कळवा असे निर्देश यांनी दिले. मात्र यावर सरकारकडून आम्हाला योग्य तो अभिप्राय मिळाला नाही, तर आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करू असा स्पष्ट इशारा तांडेल यांनी राज्य सरकारला दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
उद्या पालघर येथे आंदोलन
उद्या पालघर जिल्ह्यात निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले असून, जर येत्या दोन दिवसात बेकायदेशीर मच्छिमारांवर कायदेशीर कारवाई झाली नाही, किंवा आम्हाला सरकारचा योग्य तो अभिप्राय प्राप्त झाला नाही, तर मुंबईत देखील आम्ही आंदोलन सुरू करू, असा स्पष्ट इशाराही तांडेल यांनी दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times