सोलापूर : शहर – जिल्ह्यात करोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळं जिल्हा परिषदेत होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणायचा निर्णय घेण्यात आलाय. १६ ते २६ मार्च असे दहा दिवस अभ्यंगतांसाठी प्रवेशबंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी घेतलाय. स्वामी स्वतः होम कोरोंटाईन असून त्यांनी मंगळवारी हा आदेश काढला.

आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असून दुसरीकडे कार्यालयांमध्ये कांही केल्या गर्दी कमी होताना दिसत नाही.सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. जिल्हा परिषदेचं पार्किंग फुल्ल होत असून गाड्या लावायला जागा नसते,त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयात कायम गर्दी दिसते तसेच जिल्हा परिषदेला तीन प्रवेशद्वार असल्याने शहरातील विनाकारण फिरणाऱ्याची गर्दीही जास्त होत आहे.या सर्व बाबींचा विचार करता तसेच कोरोनाचा वाढत चाललेला प्रार्दुभाव लक्षात घेता, जिल्हा परिषदेतील गर्दी कमी करणे गरजेचे असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी अभ्यागतांना जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात प्रवेश बंदी आदेश काढले आहेत.

या आदेशामध्ये दिनांक १६ मार्च ते २६ मार्च या दहा दिवस ही प्रवेशबंदी असणार आहे. जिप सदस्य, लोकप्रतिनिधी,अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांना वगळता इतर कुणालाही जिल्हा परिषद परिसर तसेच कार्यालयात बंदी घालण्यात आली आहे. ज्यांना निवेदन, तक्रार अथवा काही मागणी असेल त्यांनी ऑनलाइन पद्धतीने जिल्हा परिषदेच्या ईमेलवर तसेच वेबसाईटवर पाठवावे असे आवाहनही सीईओ स्वामी यांनी केले आहे. आलेल्या अर्जावर तात्काळ कार्यवाही केली जाईल. त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असेही स्वामी यांनी या आदेशात म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here