जळगाव: महापालिकेतील भाजपचे २७ नगरसेवक शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्याने नेते, आमदार अडचणीत सापडले आहेत. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्यामुळे महाजन आता दुहेरी संकटात सापडले आहेत.

वाचा:

जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी गुरुवारी (दि.१८) निवडणूक होत आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सत्ताधारी भाजपच्या २७ नगरसेवकांनी विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेला साथ देत बंड पुकारले आहेत. त्यामुळे भाजप नेते व संकटमोचक गिरीश महाजन महापालिका राजकारणातले डॅमेज कंट्रोल करण्यात व्यस्त असतानाच त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भाजपासमोरील संकट गडद झालं आहे. रविवारी रात्री गिरीश महाजन यांनी जळगाव विमानतळावर नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान देखील महाजन तापाने फणफणले होते.

वाचा:

गेल्या दोन दिवसांपासून गिरीश महाजन यांना ताप होता. सोमवारी ते मुंबईला रवाना झाले होते. तर मंगळवारी तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती भाजपच्या पदाधिकऱ्यांकडून मिळाली आहे. महाजन यांचा तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी रुग्णालयातूनच गिरीश महाजन राजकीय सूत्रं हलवत आहेत. तसेच काही नगरसेवकांशी देखील ते संपर्कात असल्याचे समजते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here