मुंबई: राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या आमसभा या प्रत्यक्ष सभागृहात घेण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली असता राज्य सरकारची भूमिका योग्य ठरवत याचिकादारांना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अशा आमसभेला सध्या परवानगी देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारकडून कोर्टात मांडण्यात आली व करोनाची दुसरी लाट राज्यात आल्याचा महत्त्वाचा उल्लेखही करण्यात आला. त्याआधारावर आदेश देत हायकोर्टाने ही याचिका निकाली काढली. ( )

वाचा:

ठाणे महापालिकेतील नगरसेवक व अन्य एका नगरसेवकाने व्हर्च्युअल सभेऐवजी प्रत्यक्ष सभागृहात आमसभा घेण्याची परवानगी मिळावी, यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र या दोघांची विनंती हायकोर्टाने अमान्य केली. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अशी परवानगी देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने मांडल्याने त्याआधारेच हायकोर्टाने आदेश दिला.

वाचा:

“सध्या पुन्हा आली असून संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे तूर्तास प्रत्यक्ष सभागृहात नगरसेवकांच्या उपस्थितीत आमसभा घेऊ देण्याची परवानगी देता येणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच या निर्णयाविषयी एक महिन्यानंतर सद्यस्थिती लक्षात घेऊन पुन्हा योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे”, अशी माहिती सरकारी वकील यांनी हायकोर्टात दिली. त्यानंतर “नागरिकांच्या आरोग्याचे हित जपण्यासाठी राज्य सरकार घेत असलेल्या धोरणात्मक निर्णयांचा आदर करायला हवा. त्यामुळे याप्रश्नी आम्ही हस्तक्षेप करणार नाही. मात्र, परिस्थिती सुधारल्यानंतर प्रत्यक्ष आमसभेला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाईल, अशी आम्हाला आशा आहे”, असे मुख्य न्यायमूर्ती व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने आदेशात म्हटले आणि याचिका निकाली काढली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here