महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत सावंत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या १५ मार्चच्या निर्णयाने आरोपीची खासगी माहिती तिसऱ्या व्यक्तीला देणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. देवेंद्र फडणवीस यांनी मिळालेल्या सीडीआरचा स्त्रोत न सांगून व सीडीआर स्वतःकडे ठेवून ते २ आरोपींना पाठिशी घालत आहेत. त्यांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये ही विनंती, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. तसंच, एका बातमीचं कात्रणही त्यांनी ट्वीट केलं आहे.
वाचाः
दरम्यान, याआधीही सचिन सावंत यांनी सीडीआरवरुन फडणवीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ‘देवेंद्र फडणवीस यांनी CDR ची माहिती तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शिक्षा करण्यास मदत करावी. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणं त्यांचं कर्तव्य आहे,’ असं सावंत यांनी म्हटलं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times