सिंधुदुर्गः जिल्ह्यातील वैभववाडी वीज वितरण कार्यालयातील अनागोंदी व मनमानी कारभाराविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वीज वितरण कार्यालयासमोर आज कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी आणि पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांच्या विरोधातील पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर केले. भाजप कार्याकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या तक्रारीचा पाढा वाचून दाखवल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्यावरील तक्रारीची कबुली दिली आहे.

महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांच्या विरोधातील फरक याचे पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर केले. तर कनेक्शन देण्याकरीता टाळाटाळ केली व पैशांची मागणी केली, असा आरोप भाजपने केला होती. आरोपांवर या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्यावरील तक्रारीची कबुली दिली व माफी मागितली आहे.

वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना मुदत द्या, करोना काळातील वाढीव बिले माफ करा, करोनामुळे नागरिक त्रस्त असल्याने ग्राहकांना तगादा लावू नका अश्या मागण्या भाजपने केल्या आहेत. या मागण्या असतानाच आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयातील अनागोंदी व मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवत ठिय्या आंदोलन केलं होतं. भाजपाने आक्रमक पवित्रा घेतल्याने वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना अखेर नमतं घ्यावं लागलं आहे. भाजपने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळं एका अधिकाऱ्याने आंदोलनस्थळी जमिनीवर नाक घासत माफी मागितली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here