सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयए आता मनसुख हिरन आत्महत्या प्रकरणाचाही तपास करत आहे. वाझे यांनी हे सर्व स्वत:च्या मर्जीने केलेले नसून यामागे आणखी बड्या व्यक्तींचा समावेश असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. त्यामुळं भाजपनं राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासर्वांवर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
वाचाः
सचिन वाझे शिवसेनेशी संबंधित असल्याच्या चर्चांवरुन राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘एखादी व्यक्ती पूर्वी शिवसेना किंवा राजकीय पक्षासोबत संबंधित असेल तर चुकीचं आहे का? शिवसेना ही बंदी घातलेली संघटना नाही. प्रत्येक मराठी माणूस शिवसेनेशी संबंधित आहे,’ असं राऊत म्हणाले आहेत.
वाचाः
‘सचिन वाझे प्रकरणावर काहीही घडामोडी घडत नाहीयेत, असं राऊतांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय, एका एपीआयमुळं सरकार अस्थिर झालंय या भ्रमातून बाहेर पडलं पाहिजे. चंद्रशेखर यांचं दिल्लीतील सरकार दोन हवालदारांमुळे कोसळलं होतं, मात्र महाराष्ट्रात तसं काही होणार नाही,’ असं म्हणत राऊतांनी विरोधकांना फटकारलं आहे.
खातेबदल नाही
‘कोणाला कोणती खाती द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. पण हे तीन पक्षाचं सरकार आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख निर्णय घेतील. मुख्यमंत्री हे कॅबिनेटचे प्रमुख असतात. कोणत्या मंत्र्यांच्या प्रगती पुस्तकात कोणता शेरा लिहायचा, हे मुख्यमंत्री ठरवतील, अर्थात हा अधिकार शरद पवारांनाही आहे,’ असं राऊत म्हणाले आहेत.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times