मुंबईः राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी विविध विषयांवरील खोचक व टीकात्मक ट्वीटमुळं सतत चर्चेत असतात. सध्या राज्यात प्रकरणामुळं वातावरण तापलं आहे. अमृता फडणवीस यांनीही वाझे यांच्यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीच्या रात्री स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती. या कारमध्ये जिलेटिनच्या १९ कांड्या आढळून आल्या होत्या. या कारचा मालक मनसुख हिरन यांचा काही दिवसांनी अचानक मृत्यू झाला. भाजपच्या नेत्यांनी यात सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर वाझे यांची मुंबई क्राइम ब्रँचमधून बदली करण्यात आली होती. त्यानंतर हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्यानंतर एनआयएनं १२ तासांच्या मॅरथॉन चौकशीनंतर वाझेंना अटक केली होती. वाझेंच्या अटकेनंतर अमृता फडणवीस यांनी सरकारला घेरलं आहे. त्यांनी केलेलं एक ट्वीट सध्या चर्चेला विषय ठरत आहे.

वाचाः

अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट करत वाझे प्रकरण आणि करोना संसर्ग यावरुन ठाकरे सरकारवर टीका केली आहे. एकीकडे नागपूरसारख्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांना भरती करण्यासाठी खाटा उपलब्ध नाहीत. तर, दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करत आहेत, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवाय, उद्योगपतींना भीती दाखवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आपल्याच काही हस्तकांसोबत तयार करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here