यवतमाळ: विवाह सोहळा म्हटले की, लाखोंचा खर्च, पाहुणे, बँड बाजा आलाच. यात वर आणि वधु दोन्हीकडील मंडळी खर्च करतात. मात्र, यवतमाळ जिल्ह्यात एक अनोखा विवाह पार पडला आहे. अवघ्या १३५ रुपयांत विवाह पार पडला आहे. हा विवाह सोहळा नोंदणी पद्धतीने पार पडला आहे.

वधू मंगला संजय श्रीरामजिकर ही यवतमाळ तालुक्यात येणाऱ्या अकोला बाजार कामठवाडा येथील रहिवासी आहे तर वर राजेश बोरकर अमरावती येथील दस्तुरनगर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे दोघेही मूक बधिर आहेत. नातेवाईकांनी पुढाकार घेऊन हा विवाह प्रसंग जुळवून आणला. विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नातेवाईकांना न बोलावता मुलाकडील आई- वडील, काका, काकू आणि मुलीकडील आई -वडील, बहीण, भाऊ एवढीच मोजकी मंडळी उपस्थित होती.

वाचाः

सर्व नातेवाईक नोंदणी कार्यालयात आले. आणि केवळ १३५ रुपये खर्च करून आयुष्यभराच्या गाठी बांधल्या गेल्या. विवाह सोहळ्यात लाखो रुपयांचा खर्च न करता साध्या पध्दतीने कार्यक्रम पार पडू शकतो हे बोरकर आणि श्रीरामजीकर परिवाराने दाखवून दिले आहे. त्यामुळं परिसरात या विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरत आहे. तसंच, वधु- वरांचे व नातेवाईकांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुकही करण्यात येत आहे.

वाचाः वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here