यवतमाळः देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत. शहरी भागाचा विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना. मात्र, ग्रामीण भागात अजूनही सोयी सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याचं चित्र आहे. ना रस्ता, ना घरकूल, पाण्यासाठी भटकंती, अशा भयावह अवस्थेत स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही गोकुळ हेटीवासीयांना जगावे लागत आहे.

तालुक्यात बोथबोधन हे गाव आहे. येथूनच एक किलोमीटर अंतरावर गोकूळ हेटी आहे. बोथबोडन ग्रामपंचायत येथे नळ योजना आहे. जवळच असलेल्या गोकूळ हेटी येथे तीव्र निर्माण झाली असून नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. पाईपलाइन टाकून दिली आहे. विहिरीला पाणी आहे. पण एक किलो मीटरवरील गोकूळ येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

महिलांच्या सोबत लहान मुलांना पाण्यासाठी जावे लागत आहे. पाच ते दहा किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याने नागरिकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. येथे गवळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा दूधाचा व्यवसाय आहे . प्रत्येक व्यक्तीकडे ५० ते १०० जनावर आहेत. दुभत्या जनावरांना कसे जगावावे असा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

२००५ मध्ये पाइप लाइन टाकून नळ कनेक्शन दिले होते. गावातील विहिरीवरुन येथे योजना आहे. पूर्वी १९८७ मध्ये या विहिरी वरुन बोथबोडन व हगोकूळ हेटी येथे या योजनेतुन पाणी पुरवठा होता. आता पाईपलाईन चोकअप झाल्याने कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी सरपंचांची भेट घेऊन व्यथा मांडली. मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही, असा आरोप नागरीकांनी केला आहे.

गावात रस्ता नाही. स्थानिक आमदारांनी तीन वर्षांपूर्वी रस्ता मंजूर करून निधी दिला होता. कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले. त्यामुळे आता या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. गरजू लोकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. दहा वर्षांपूर्वी शाळेसाठी जोता बांधण्यात आला होता. त्यापुढे शाळा बांधकामाचे घोडे कुठे अडले, हे कुणालाच माहिती नाही. डीपीही सताड उघडी राहत असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच विकासाचा गाजावाजा केला जात असला तरी गोकूळ हेटी येथील समस्या बघून सरकारचा दावा किती फोल आहे, हे दिसून येते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here