म. टा. प्रतिनिधी, : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला तलवारी आणि तीक्ष्ण हत्यारांचे फोटो ठेवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईतासह दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तलवार, पालघन अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

अमर लक्ष्मण गायकवाड (वय २३, रा. जनता वसाहत) व भीमा शत्रूघ्न शिंदे (वय २२, वाघजाई मित्रमंडळ, जनता वसाहत) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसद्वारे गुन्हेगारी किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

दत्तवाडीत दोघे जण व्हॉट्सअप स्टेट्सला तलवारी व घातक हत्यारांचे फोटो ठेवून दहशत निर्माण करत असून, त्यांच्याकडे हत्यारे असल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांच्या पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडील तलवार व पालघन जप्त करण्यात आले आहे. अमर गायकवाड सराईत गुन्हेगार असून, काही दिवसांपासून तो व्हॉट्सअपला सतत शस्त्रांचे फोटो ठेवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here