इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध पुन्हा एकदा सुरळीत होतील असा विश्वास करताना पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी भारताला पहिले पाऊल उचलावे लागेल. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये हा एक अडथळा असल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानमधील थिंक टँकच्या सहकार्याने राष्ट्रीय सुरक्षा विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय संमेलनात इम्रान खान बोलत होते. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करांमध्ये २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा भागात शस्त्रसंधी लागू करण्यात आली. त्यानंतर इम्रान खान यांनी पहिल्यांदा भारत-पाक संबंधावर सार्वजनिकपणे भाष्य केले आहे.

वाचा:
भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयाबद्दल अप्रत्यक्षपणे बोलताना इम्रान खान म्हणाले की, हाच एक मुद्दा सध्या दोन्ही देशांतील संबंध सुधरवण्यापासून रोखत आहे. आपल्या बाजूने प्रयत्न सुरूच राहतील. मात्र, भारताला त्या दिशेने पहिले पाऊल उचलावे लागेल. पाच ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेल्या निर्णयामुळे भारताला आता पुढाकार घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले.

वाचा:
काश्मीरचा मुद्दा प्रामुख्याने असून चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न कसा सोडवता येऊ शकतो, याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असून दोन शेजारी देशांमध्ये अधिक चांगले संबंध निर्माण होण्याची गरज असल्याचेही खान यांनी म्हटले.

वाचा:
आपण २०१९ मध्ये पाकिस्तानच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतासोबतचे सर्व मुद्ये सोडवण्यासाठी प्रयत्नशील होतो. मात्र, जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवणे हा मोठा धक्कादायक निर्णय होता आणि तेथूनच दोन्ही देशातील संबंध पूर्णपणे तुटले असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरच्या मुद्यावर सकारात्मक चर्चा सुरू झाल्यास त्याचा परिणाम दोन्ही देशांवर होईल. गरिबी दूर करायची असल्यास दोन्ही देशांमध्ये व्यापारीक आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here