मुकेश अंबानी यांच्याघरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये १९ जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. या प्रकरणी एनआयएनं सचिन वाझे यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. सचिन वाझेंच्या अटकेनंतर मुंबई पोलीस आयुक्त व गृहमंत्री यांचे निलंबन करा, अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे. अखेर मुंबई पोलीस आयुक्तांची आज बदली करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर भाजपच्या नेत्यांनी सरकारला घेरलं आहे.
‘एका सामान्य नागरिकाचा खून, एक एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांचं बंडल, नोटा मोजण्याचे मशीन, गाडीत नंबर प्लेटचा खच. त्यावरुन मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, असा खोचक टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे. तसंच, दुर्दैवानं इतकं मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनाम कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे’, असं शेलार यांनी म्हटलं आहे.
‘परमबीर सिंह यांची बदली पुरेशी नसून ठाकरे सरकारने त्यांचे तात्काळ निलंबन करायला हवं. अँटिलिया प्रकरणात त्यांच्या भूमिकेची चौकशी हवी. कायदा सुव्यवस्थेचा बट्याबोळ करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही राजीनामा घ्यायला हवा’, असं ट्वीट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times