मुंबई: राज्यातील शिक्षकांच्या ‘ऑनलाइन बदल्या’ करण्याच्या भाजप सरकारचा निर्णय नव्या सरकारकडून रद्द केला जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, तो निर्णय होण्याआधीच भाजपनं त्यास आक्षेप घेतला आहे. ‘शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. तो रद्द करून शिक्षकांना पुन्हा त्रासात ढकलू नका, असं आवाहन माजी मंत्री यांनी केलं आहे.

वाचा:

गेल्या दोन वर्षांपासून राज्यस्तरावरुन जिल्हा परिषदेच्या मालकीच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. बदल्यांमधील अर्थकारण व वशिलेबाजीला चाप बसावा म्हणून हा निर्णय घेतल्याचा दावा भाजप सरकारनं केला होता. मात्र, ऑनलाइन बदली प्रक्रियेस शिक्षकांचा विरोध आहे. अलीकडंच विविध शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी संयुक्तपणे मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. ‘ऑनलाइन बदली प्रक्रिया रद्द करावी, शिक्षकांच्या बदलीचे अधिकार जिल्हा परिषदेला द्यावेत, एकदा बदली झाल्यास पुन्हा तीन वर्षे बदली करु नये, ज्या शिक्षकांच्या गैरसोयीत बदल्या झाल्या आहेत त्यांना बदली प्रक्रियेत प्राधान्य द्यावे, आपसी बदल्यांना परवानगी मिळावी, पती, पत्नी शिक्षकांची बदली ३० किलोमीटरच्या आत करावी,’ अशा मागण्या त्यात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुश्रीफ यांनी ऑनलाइन बदली प्रक्रिया रद्द करण्याचे संकेत दिले होते. त्यावरून आता वादाला सुरुवात झाली आहे.

वाचा:

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या या भूमिकेला जोरदार विरोध दर्शवला आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी नव्या सरकारला हा निर्णय रद्द न करण्याचं आवाहन केलं आहे. ‘ हा विषय, जनतेतून थेट सरपंच निवड व जलयुक्त शिवार सारखा महत्त्वाचा आणि लोकप्रिय आहे. जो गरीब आहे ज्याचा वशिला नाही, त्यालाही अधिकार असावेत. असे निर्णय रद्द करण्यापेक्षा सर्व विभागांनी त्यांचं अनुकरण करायला हवं,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ‘विद्यादानाचं पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांना कायमचं त्रासातून मुक्त करण्याच्या दृष्टीनं आम्ही हा निर्णय घेतला आहे. तो रद्द करून शिक्षकांना पुन्हा त्रासात ढकलू नका,’ अशी विनंती त्यांनी केली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here