मुंबईः सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्य पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. परमबीर सिंह यांच्या जागी आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर भाजपनं राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यावरुन यांनी विरोधकांना खडसावलं आहे.

मुकेश अंबानी यांच्याघरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये १९ जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. या प्रकरणी एनआयएनं सचिन वाझे यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. सचिन वाझेंच्या अटकेनंतर मुंबई पोलीस आयुक्त व गृहमंत्री यांचे निलंबन करा, अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली होती. तसंच, या प्रकरणामुळं राज्य सरकार अडचणीत येणार असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांवर संजय राऊत यांनी एक विरोधकांना इशारा दिला आहे.

वाचाः

‘मुंबई तसंच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एखाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here