आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज राज्यातील लसीकरण कार्यक्रमाबद्दल जनतेला माहिती देत होते. त्यावेळी त्यांनी हा संकल्प स्पष्ट करून सांगितला. कोविड लसीकरणासाठी आपल्या राज्यात एकूण १ हजार ८८० केंद्रे महाराष्ट्रात मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यांमध्ये आतापर्यंत आपण ३३ लाख ६५ हजार ९५२ एवढ्या नागरिकांचे लसीकरण केले आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.
राज्याने आतापर्यंत केलेल्या लसीकरणात आरोग्य कर्मचारी, आघाडीच्या फळीतील कर्मचारी, ६० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या व्यक्ती आणि ४५ पेक्षा जास्त वय असलेले मात्र ज्यांना वेगवेगळे आजार आहेत अशा व्यक्तींचा समावेश असल्याचे टोपे म्हणाले. समाजातील या घटकांच्या लसीकरणासाठी आतापर्यंत २ लाख ३२ हजार ३४० एवढे कालचे लसीकरण झालेले आहे अशी माहिती टोपे यांनी दिली. राज्याने आता दिवसाला तीन लाखाच्या गतीने लसीकरण करण्याचा निर्धार केला असल्याचेही आरोग्यमंत्री म्हणाले. मात्र आपल्याला अशी गती वाढवण्यासाठी लस देखील तेवढ्याच गतीने प्राप्त होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
पुढील तीन महिन्यात एकूण २ कोटी २० लाख डोस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून ते तीन महिन्यात पूर्ण करायचे असल्याचे टोपे म्हणाले. हे लक्ष्य गाठण्यासाठी आठवड्याला २० लाख डोस देणे आवश्यक आहे. यासाठीच आपण २० लाख डोसची मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडे केली असल्याचे टोपे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
‘आता फक्त १० दिवसांचा साठा उपलब्ध’
याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांना पत्र लिहिलेले आहे. दररोज तीन लाख इतके लसीकरण केल्यास आता आपल्याकडे केवळ दहा दिवसांचा साठा उपलब्ध आहे. ही माहिती राजेश भूषण यांना देण्यात आल्याचे टोपे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times