आज राज्यात एकूण ८४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२४ टक्के इतका आहे. राज्यात आज ९ हजार १३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २१ लाख ६३ हजार ३९१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.२६ टक्के इतके झाले आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५२ हजार ७६० इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ३२ हजार ३५९ इतरे रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून तो २१ हजार ४९६ इतका झाला आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १५ हजार ४१० इतका आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या १४ हजार ६४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
या बरोबरच नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९ हजार ८२१ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या ३ हजार ६९७, औरंगाबादमध्ये ९ हजार ६२१, जळगावमध्ये ४ हजार ६१०, अहमदनगरमध्ये २ हजार ९५१ इतकी आहे. तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ४५० इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या २६९ इतकी आहे.
६,७१,६२० व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७८ लाख ५३ हजार ४९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३ लाख ७० हजार ५०७ (१३.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ७१ हजार ६२० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ६ हजार ७३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times