म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना आज, बुधवारी घडली. या दगडफेकीत कोणताही प्रवासी जखमी झालेला नाही. धावत्या लोकलवर दगडफेक झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची गंभीरपणे दखल घेत रेल्वे सुरक्षा दलाने लोकलवर दगडफेक करणाऱ्या विरोधात मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

“सहा गाड्यांच्या डब्याच्या मधल्या खिडकीचे नुकसान झाले. घटनेची वेळ किंवा ठिकाण अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) आरोपीची ओळख पटवण्यासाठी संपूर्ण विभागाचे फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला आहे.” अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. करोना काळात डिसेंबर महिन्यात सीएमएमटी ते कल्याण स्थानकादरम्यान १० सुरू करण्यात आल्या आहेत.

वाचाः

लोकलप्रवास आता ‘उत्तम’

मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुसह्य होण्यासाठी ‘उत्तम’ लोकल प्रवासी सेवेत दाखल करण्यात आली आहे. या लोकलच्या आसनव्यवस्थेत प्रवाशांच्या मागणीनुसार अर्थात बसल्यावर पाठीला आधार मिळावा यासाठी आवश्यक बदल करण्यात आले आहेत. वातानुकूलित लोकलच्या धर्तीवर या लोकलमध्ये देखील साखळीऐवजी बटणाचा पर्याय देण्यात आला आहे. हे बटण दाबून आपत्कालीन वेळेत लोकल थांबवता येणे शक्य आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here