आम्हाला संघर्ष करायला लावू नका. तुम्हाला बोटीमध्ये टाकून पोलिसांना सोबत घेऊन जिथे एलइडी फिशिंग चालू आहे तेथे घेऊन जाणार आणि तिकडचा माल जप्त केला नाही आणि तुम्ही बोटी पळविल्या तर तुम्हाला रस्त्यावर जो न्याय द्यायचा तो आम्ही तुम्हाला देणार, असे आपण अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितल्याचे राणे म्हणाले.
येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये बेकायदेशीर मच्छिमारांवर काय कारवाई होते, हे मला सांगतील. त्यानंतर ते जे दिशा ठरवतील तीच आमच्या आंदोलनाची दिशा असेल, असे निलेश राणेंनी सांगितले. मालवण येथे पारंपरिक मच्छिमारांच्या आंदोलनस्थळी भाजप माजी खासदार निलेश राणे यांनी भेट दिली आणि आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.
क्लिक करा आणि वाचा-
महाराष्ट्र राज्याचे उंच तंत्र शिक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत याच्यावर देखील त्यांनी टीका केली. सामंत हे पारंपरिक मच्छिमारांना न्याय देऊ शकणार नाहीत. पारंपरिक मच्छिमार रत्नागिरी जिल्ह्यात कमी प्रमाणात आहेत. तेथे पर्ससीन व मोठ्या पर्ससीन बोटी मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून त्यांना पारंपरिक मच्छिमारांना न्याय देताच येणार नाही, असा आरोप त्यांनी केला.
क्लिक करा आणि वाचा-
‘तर फिशरी विभागात साप सोडेन’
जर मत्स्य अधिकारी सुधारले नाहीत आणि पारंपरिक मच्छिमाराचा प्रश्न सुटला नाही, तर मत्स्यव्यवसाय विभागात साप सोडेन, असे आपण मच्छिमार विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून आलो असल्याचेही राणे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times