ही ज्या ठाण्यात काम करत होती, त्याच पोलिस ठाण्यातील एक वरिष्ठ अधिकारी या कॉन्स्टेबलला वॉट्सॲपवर मॅसेज करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. याद्वारे हा अधिकारी तिला मानसिक त्रास देत होता आणि यामुळेच या कॉन्स्टेबलने आत्महत्या केली असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मानसिक त्रास देणारा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करत असून केतन मांजरे असे त्याचे नाव आहे. मांजरे यांनीच या महिला कॉन्स्टेबलला मानसिक त्रास दिल्याचे कुटुंबीय सांगतात. या घटनेबाबत पोलीसांनी मात्र अद्याप कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही.
क्लिक करा आणि वाचा-
या मृत महिलेचे आणि पोलीस उपनिरीक्षकाचे व्हॉट्सअॅपवरील चॅटिंग तिच्या नवऱ्याने पाहिले होते. यामुळे रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. मात्र, ही आत्महत्या नेमकी कशामुळे घडली याची चौकशी करूनच गुन्हा नोंद करणार असल्याचेपोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांनी सांगितले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times