म.टा. प्रतिनिधी, नागपूर

क्या बे… पैदल है क्या ?.. काय करून रायला… झामल झामल.. बावा.. काउन.. सही बे… तर्री पोहे.. भैताड हे शब्द जरी कानावर पडले तरी मुक्काम पोस्ट नागपूर आहे, हे सांगण्याची वेगळी गरज पडत नाही. नागपुरात बोलल्या जाणाऱ्या या भाषेचा न्यूनगंड न बाळगता त्याचा अभिमान असावा याच उद्देशाने ही नागपुरी भाषा आता थेट सदर छावणी परिसरातील ‘’ने उभारलेल्या उड्डाणपुलाच्या पिलरवर उतरली आहे. ( is now visible on the erected by )

शहर सौंदर्यीकरण करण्याबरोबर त्यात स्थानिक भाषा आणि संस्कृती झळकावी या उद्देशातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्याच हस्तांकित डिझायनिंग फर्मला सौंदर्यीकरणाचे काम दिले. लिबर्टी चौक ते कोराडी मार्गावरील उड्डाणपुलाचे पिलर रंगविण्याचे काम या संस्थेने हाती घेतले असून विविध भागात विविध थिमनुसार रंगरंगोटी करण्यात येत आहे. खास फिरण्यासाठी सदर परिसरात येणाऱ्या युवकांना या परिसरात आनंद घेता यावा यासाठी त्यांना आकर्षित करेल असे नागपुरी भाषेतील शब्द वापरण्यात आले असल्याचे ‘हस्तांकित’च्या संचालिका दीप्ती देशपांडे यांनी सांगितले. हाव.. समोसा खायेगा… पैदल है क्या… एक नंबर अशी नागपूरकरांच्या रोजच्या जगण्यातील भाषा आता पिलरवर झळकल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

कुठे वाघोबा, तर कुठे खेळांजी मज्जा

सदर परिसरातील दोन पिलरवर नागपुरी शब्दांचा वापर करण्यात आला असून इतर पिलरवर विविध थिम रंगविण्यात आल्या आहे. मानकापूर क्रीडा संकूल परिसरात खेळांना महत्त्व देऊन तसे चित्र साकारण्यात आले आहेत. काटोल मार्गावर अॅक्वा थिम साकारण्यात आली असून मासे आणि पक्ष्यांना स्थान देण्यात आले आहे. छावणी परिसरात तर झेपावणारे अवकाश यान बघायला मिळेल.

क्लिक करा आणि वाचा-

या भागातील १५ पिलरवर पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, मंगळवारी तर एलियनचीही भेट होणार आहे. सदरमधील पिलरवर जय वाघ वाघाची आठवण म्हणून त्याचे चित्र साकारण्यात आले आहे. राजभवनच्या परिसरात नागपुरात होऊन गेलेल्या प्रसिद्ध व्यक्तींचे चित्र झळकणार असून एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here