हदगाव तालुक्यातील हे गाव ‘माझे गाव सुंदर गाव’ या महाराष्ट्र शासनाच्या अभियानांतर्गत गुलाबी रंगाने नटलंय. त्यामुळे साप्ती आता पिंक व्हिलेज म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाईल.
हदगाव तालुक्यातील पैनगंगा नदीकाठचे मराठवाडयातील शेवटचे गांव साप्ती. प्रशासन सध्या कोरोना संकटाशी मुकाबला करीत आहे. दिवसागणिक रुग्णाची संख्या वाढत आहे आणि इकडे साप्ती गांवच्या विकासासाठी गांवकरी दिवस रात्र झटत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतील जय-पराजय, हेवेदावे विसरून थेट सरपंचापासून ते ग्रामसेवक, आजी-माजी पदाधिकारी, माजी सरपंच, उपसरपंच, आबालवृद्ध सगळेच गावासाठी झटत आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
गावात शुद्ध पेयजल, शौचालय, रस्ते, वीज, शिक्षण, पांदनरस्ते, गांडूळखत निर्मिती, वृक्षारोपण, स्मशानभूमी सुशोभीकरण अशा कामांच्या माध्यमातून हे गाव विकासाची घोडदौड करत आहे.
क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times