६ सप्टेंबर २०१६ ला सकाळी ८ वाजताच्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवरील लाल इमली चौकात बेछूट गोळीबार करून एकनाथ निमगडे यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. पाच वर्षांपासून सीबीआय या हत्याकांडाचा तपास करीत होते. सीबीआयने मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यांना पाच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. मात्र मारेकऱ्यांबाबत सीबीआयला माहिती मिळाली नाही.
दरम्यान, हिंगण्यातील दरोडा प्रकरणात पोलिसांनी रणजित व कालू हाटे याचा साथीदार कुख्यात राजा ऊर्फ पीओपी याला अटक केली. राजाचा या हत्याकांडात सहभाग असल्याची माहिती अमितेशकुमार यांना मिळाली. गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने यांना राजाची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले. गुन्हेशाखा पोलिसांनी राजाची कसून चौकशी केली असता रणजित सफेलकर याने कालू हाटे याच्या माध्यमातून जुलै २०१६ मध्ये कुख्यात नवाब ऊर्फ नब्बू अशरफी याला निमगडे यांच्या हत्येची सुपारी दिली.
क्लिक करा आणि वाचा-
सुरुवातीला सफेलकर याने नब्बू याला २० लाख रुपये दिले. नब्बू याने राजा पीओपी, शहबाज, अलताफ, मुश्ताक अशरफी, परवेज, अशरफ, अफसर, बाबा व अन्य साथीदारांची जुळवाजुळव केली. नब्बू याला निमगडे यांच्या हत्येची संधी मिळाली नाही. सप्टेंबर महिन्यात रणजित याने नब्बू व त्याच्या साथीदारांना पुन्हा एक कोटी २० लाख रुपये दिले. यावेळी कालू याने नब्बू याला मारहाणही केली.
क्लिक करा आणि वाचा-
६ सप्टेंबर २०१६ ला राजा पीओपी, परवेज ,नब्बू व त्याच्या साथीदारांनी निमगडे यांची हत्या करण्यासाठी सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर पाळत ठेवली. लाल इमली चौकात राजाने निमगडे यांना गाठले. यावेळी परवेजही त्याच्यासोबत होता. परवेज याने देशीकट्ट्यातून बेछूट गोळीकार करून निमगडे यांची हत्या केली व फरार झाले. रणजित सफेलकर, कालू, परवेज, नब्बू व त्याचे साथीदार भूमिगत झाले आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
या चौकशीचा अहवाल व मारेकऱ्यांबाबत सीबीआयला माहिती देण्यात आल्याचेही अमितेशकुमार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times