मुंबईत एकूण बाधितांची संख्या ३ लाख ४९ हजार ९७४ इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या ११ हजार ५५१ वर पोहोचली आहे. मुंबईत दिवसात ८७६ रुग्ण बरे झाले आहेत. तर, आतापर्यंत एकूण ३ लाख २२ हजार १०७ म्हणजेच ९२ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
फेब्रुवारीमध्ये करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९४ टक्क्यांवर होती, आता हा दरही २ टक्क्यांनी कमी झाला आहे. सध्या मुंबईत १५ हजार ४१० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी गंभीर रुग्णांची संख्या ४२६ आहे. मंगळवारी २१ हजार ५०० चाचण्या करण्यात आल्या. एकूण चाचण्यांपैकी बारा टक्क्यांहून अधिक अहवाल बाधित आले आहेत. रुग्णवाढीचा दर रोज वाढत असून तो ०.४८ टक्के झाला आहे.
ठाणे जिल्ह्यात १४,६४४ सक्रिय रुग्ण
ठाणे जिल्ह्यात बुधवारी १,८०४ नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर सहा जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच जिल्ह्यातीलल करोना बाधितांचा आकडा आता २ लाख ९७ हजार ४४६ इतका झाला आहे. तर मृतांचा आकडा ५ हजार ८८७ इतका झाला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
जिल्ह्यात बुधवारी नोंद झालेली रुग्णसंख्या ही गेल्या चार महिन्यांचा विचार करता सर्वाधिक रुग्णवाढ असल्याचे स्पष्ट होत आहे. या बरोबरच ठाणे महापालिका क्षेत्रात ५१६, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ६३७, नवी मुंबई ३६७ रुग्ण आढळले आहेत. उल्हासनगर ६४, भिवंडी २४, मीरा भाईंदर १०७ रुग्ण आढळले आहेत.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times