ग्वाल्हेरः भाजपचे राज्यसभेचे खासदार यांच्या घराण्याचा महल जयविलास पॅलेसमध्ये चोरी झाली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील जयविलास पॅलेसमध्ये चोरांनी रानी महलमधील रेकॉर्ड रूमवर हात साफ केला. कडक सुरक्षा असूनही चोर रेकॉर्ड रूममद्ये घुसले आणि तेथील कगदपत्रे खंगाळून काढली. चोरांनी एक पंखा आणि कप्यूटरचा सीपीयूही लांबवला.

शिंदेच्या महालात चोरी झाल्याचं बुधवारी दुपारी १२.३० वाजता लक्षात आलं. दुपारी अडीच वाजता पोलिसांना माहिती मिळाली. जयविलास पॅलेसमध्ये १० वर्षांपूर्वीही चोरी झाली होती. त्यावेळी चोरांनी रेकॉर्ड रूमला लक्ष्य केलं होतं आणि काही कागदपत्र चोरले होते. पण ते सापडले नाहीत.

रानी महालाच्या ठिकाणी शिंदे घराण्याचं कुणीही गेलं की फोटो काढले जातात. या फोटोनंतर सर्व वस्तू जिथल्या तिथे आहेत की नाही या मेळ घातला जातो. बुधवारी एका फाइलची गरज पडल्यावर ती शोधली गेली. पण ती फाइल सापडली नाही. फोटोत मेळ जुळतोय की नाही पाहिलं गेलं. यावरून लक्षात आलं की तेथील पंखा चोरीला गेला आहे आणि फाइल्स अस्ताव्यस्त पडललेल्या होत्या. याच्या आधारावर चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला गेला. रेकॉर्ड रूममधील कपाटाचे कुलूपही तोडलेले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस फॉरेन्सिक एक्स्पर्ट अखिलेश भार्गवसोबत फिंगर प्रिंट टीम आणि स्निफर डॉगसह घटनास्थळी दाखल झाले. चोरी ही कुठल्यातरी कागदपत्रांसाठी झाल्याचा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासात व्यक्त केला आहे. चोर रेकॉर्ड रूपमध्ये आले होते. सगळी कागदपत्र अस्ताव्यस्त करून गेले. चोर एक जुना पंखा आणि कम्प्युटरचा सीपीयू घेऊन गेले. काही वेळानंतर पोलिसांना सीपीयू छतावर आढळून आला.

पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली आहे आणि चोर लवकरच सापडतील, असं एसपी अमित सांघी यांनी सांगितलं. जयविलास पॅलेसमध्ये इतकी कडक सुरक्षा असतानाही चोर आत कसे पोहोचले, याचा शोध पोलीस घेत आहेत, असं सांघी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here