नवी दिल्लीः देशात करोना रुग्णांच्या संख्येत आता वेगाने वाढ होताना ( ) दिसते आहे. महाराष्ट्रात तर आज २३ हजारांहून अधिक नवीन रुग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत एका दिवसात आढळून येणाऱ्या नवीन रुग्णांचा हा विक्रम आहे. दुसरीकडे पंजाब, मध्य प्रदेशसह इतर राज्यांमध्येही करोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत ( ) आहे. यावरून पंतप्रधान मोदींनी बुधवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि करोना संसर्ग रोखण्याचं आवाहन केलं. मग देशात करोनाची दुसरी लाट आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. यासंदर्भात दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया ( ) यांनी मोठी माहिती दिली आहे. देशात करोनाची दुसरी लाट आल्याचं सध्याची स्थितीवरून हेच संकेत मिळत आहेत. देशाची वाटचाल ही करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या दिशेने होत आहे, असं ते म्हणाले. तसंच करोनावरील लसीकरण मोहीमेला वेग देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

भारताची वाटचाल करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या दिशेने

देशात करोनाचे रोज मोठ्यासंख्येने नवीन रुग्ण आढळून येत आहेत. ही अतिशय चिंतेची बाब आहे. आपली वाटचाल ही करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या दिशेने होत असल्याचे हे संकेत आहेत. आता आपल्याला ठरवायंच आहे, कुठल्या दिशेने जायचं आहे. आक्रमकता दाखवून संसर्ग रोखायचा आहे की प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर जाऊ द्यायचा आहे, याचा विचार करण्याची ही वेळ आहे, असं गुलेरिया म्हणाले.

नियमांचं कठोर पालन करण्याची गरज

देशातील स्थिती अद्याप नियंत्रणात आहे. आपल्याला गेल्या वर्षीचा कित्ता पुन्हा गिरवायचा आहे. गेल्या वर्षी आपण जो धडा शिकलो तो आता पुन्हा लक्षात घ्यायला हवा. करोनाच्या नियमांचे कठोरपणे पालन होणं गरजेचं आहे. टेस्टींग, ट्रॅकिंग आणि आयसोलेशनवर भर देण्याची गरज आहे. अधिकाधिक टेस्टींग करावी लागेल. इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी पॉझिटिव्ह असणाऱ्यांना आयसोलेट करावं लागेल, असं त्यांनी सांगितलं.

आपल्याकडे करोनाविरोधात लसीचे मोठे शस्त्र आहे. जोखीम असलेल्या नागरिकांना आधी लस दिली गेली पाहिजे. यामुळे मृतांची संख्या कमी होऊ शकते. तसंच आपल्याला एका दिवसांत कमीत कमी ५० लाख डोस देण्याची आवश्यकता आहे. लसीकरणाबाबत जनजागृतीची गरज आहे. खासकरून ग्रामीण भागात हे जागृतीचे अभियान राबवले गेले पाहिजे. यामुळे ग्रामीण भागात लसीबाबतचे संभ्रम दूर होतील. तसंच लसीकरण केंद्रावर येण्या-जाण्यासाठी वृद्धांसाठी वाहतुकीची सुविधा दिली गेली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

लसीकरणाचा हेतू जीव वाचवणं आणि मृत्यू रोखण्याचा आहे. आपल्याकडे पुरेशा प्रमाणात लस आहे. ३० कोटी जनतेसाठी ६० कोटी डोसची गरज आहे. आणि एका दिवसात कमीत कमी ५० लाख नागरिकांचे लसीकरण होण्याची आवश्यकता आहे, असं डॉ. गुरेरिया म्हणाले. सध्या एका दिवसात ३० लाख नागरिकांना लस देण्याचा विक्रम आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here