वॉशिंग्टन: महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढला असताना सरकार आणि प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. काही देशांमध्ये करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमुळे मोठी हानी झाली असल्याचे समोर आले आहे. युरोपसह जगभरातील ४६ देशांमध्ये केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.

‘द इकॉनॉमिस्ट’ने करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या अभ्यासाचे विश्लेषण केले. तर, सिडनी विद्यापीठ आणि शिन्हुआ विद्यापीठाने अमेरिका आणि युरोपमधील करोनामुळे झालेल्या मृत्यूंचे विश्लेषण केले. त्याशिवाय स्पॅनिश फ्लू आणि करोनाच्या मृतांच्या आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतरच अधिक घातक असल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेत लाखोंचा मृत्यू

सिडनी विद्यापीठ आणि सिन्हुआ विद्यापीठाच्या संशोधकांनी असा दावा केला आहे की, युरोपच्या तुलनेत अमेरिकेत करोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग थोडा कमी होता. वेग कमी असला तरी अमेरिकेत ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानच्या करोनाच्या दुसर्‍या लाटेत लाख लोकांची बळी घेतला आहे. मार्च ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान अमेरिकेत करोनाची एकूण एक कोटी प्रकरणे नोंदवली गेली. मात्र, पुढील तीन महिन्यांत म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत ही संख्या दोन कोटींवर गेली होती. अमेरिकेत आतापर्यंत पाच लाख ३५ हजारांहून अधिक जणांचा करोनाच्या आजाराने मृत्यू झाला आहे.

वाचा:

युरोपियन देशांना मोठा फटका

जगातील ४६ देशांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार, विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा सर्वाधिक परिणाम युरोपियन देशांवर झाला. ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, इटली, नेदरलँड्स, स्पेन आणि स्वीडन या देशांमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अधिक नुकसान झाले. या देशांमधील वैद्यकीय यंत्रणा कोलमडून गेली.

दुसऱ्या लाटेत अधिक मृत्यू

जगातील ४६ देशांमध्ये मार्च ते मे २०२० या कालवधीत पहिल्या लाटेत २.२० लाखजणांचा मृत्यू झाला. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान या देशांमध्ये मृतांच्या संख्येत सुमारे चार लाखांची वाढ झाली असल्याचेही समोर आले आहे.

वाचा: स्पॅनिश फ्लूच्या दुसऱ्या लाटेत थैमान

शंभर वर्षांपूर्वी आलेल्या स्पॅनिश फ्लूने ही जगभरात थैमान घातले होते. वर्ष १९१८ ते १९२० या दोन वर्षाच्या कालावधीत सुमारे ५० कोटीजणांना आजाराची लागण झाली होती. तर, पाच कोटीजणांचा बळी गेला होता. स्पॅनिश फ्लूने दु्सऱ्या लाटेत अधिक थैमान घातले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here