मुंबई/नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार, अभिनेते डॉ. यांनी आरोग्य खात्याच्या संदर्भात लोकसभेत केलेल्या भाषणानं पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचा उल्लेख करत कोल्हे यांनी सरकारला काही सूचना केल्या. ‘महाराष्ट्रानं केलेली २० लाख लसींची मागणी केंद्र सरकारनं त्वरीत पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘ज्याचा गड सुरक्षित, त्याचा मुलुख सुरक्षित’ असं सांगत महाराष्ट्राचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

वाचा:

अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणात आरोग्य क्षेत्रासंबंधी अनेक गोष्टींचा उहापोह केला. केंद्राच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रावर कसे दुर्लक्ष झाले आहे याचे दाखले त्यांनी आकडेवारीसह दिले. ‘केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यासाठी सरकारनं अर्थसंकल्पात २ लाख २३ हजार कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. ही तरतूद अर्थसंकल्पाच्या केवळ ३२ टक्के एवढी आहे. म्हणजे केवळ ७२ हजार कोटी रुपये आरोग्यासाठी राखून ठेवले गेले आहेत. ही रक्कम आपल्या जीडीपीच्या केवळ १.५ टक्के इतकीच आहे. करोना संकटकाळात आरोग्य व्यवस्थेमधील दोष दिसून आले असताना देखील ही अल्प तरतूद आरोग्यासाठी करण्यात आली आहे, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

वाचा:

‘केंद्र सरकारनं देशभरात २२ एम्स निर्माण करण्याची घोषणा केली. पण यासोबतच सरकारी हॉस्पिटल्सच्या निर्मितीसाठी भौगोलिक विभागणीसोबत लोकसंख्येच्या घनतेचे निकष देखील विचारात घेतले पाहिजेत. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सरकारी हॉस्पिटल्सची उभारणी केली गेली पाहिजे. दरवर्षी रस्त्यांवरील अपघातांमध्ये जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. तर साडे चार लाख लोक अपंग होतात. यात तरुण व मध्यमवयीन व्यक्ती जास्त असतात. अपघातानंतर वेळेवर मिळणारे उपचार महत्त्वाचे असतात. त्यामुळं महामार्गावर दर ५० किलोमीटरवर ट्रॉमा केअर हॉस्पिटलची उभारणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

वाचा:

‘शिरूर मतदारसंघामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप आणि सीएसआरच्या माध्यमातून इंद्रायणी मेडीसिटी प्रोजेक्ट सुरू करत आहोत. यामध्ये ९ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि डायग्नॉस्टिक सेंटरचा यामध्ये समावेश आहे, यासाठी केंद्र सरकारने विशेष निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

आयएएस, आयपीएसच्या धर्तीवर आयएचएस सुरू करा!

‘आरोग्य आणि शिक्षणावरील खर्चासाठी ४ टक्के सेस वसूल केला जातो. त्याचा विनियोग कसा आणि कुठे केला याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. आरोग्य यंत्रणेमध्ये आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे हे करोनामुळं आपल्याला कळून चुकलं आहे. त्यामुळं आरोग्य सेवेसाठीच्या धोरणनिश्चिती आणि उपाययोजना केल्या जाव्यात. त्या अंतर्गत आयएएस आणि आयपीएसच्या धर्तीवर आरोग्य क्षेत्रासाठी देखील ‘इंडियन हेल्थ सर्व्हिसेस’ची (आयएचएस) निर्मिती केली जावी. जेणेकरून आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या हातात देशाच्या आरोग्याचा कारभार सोपविला जाऊ शकेल,’ अशी सूचनाही त्यांनी केली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here