जळगाव:

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसनं ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्यानंतर आता महापालिकेत शिवसेनेनं भाजपला जोरदार दणका दिला आहे. भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीनं शिवसेनेनं जळगाव महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यामुळं सलग दुसरी महापालिका भाजपच्या हातातून निसटली आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडींमुळं बॅकफूटवर असलेल्या महाविकास आघाडीसाठी विशेषत: शिवसेनेसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

जळगाव महापालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा तब्बल १५ मतांनी पराभव करत बाजी मारली. जयश्री महाजन यांना ४५ मतं मिळाली , तर प्रतिभा कापसे यांना ३५ मते मिळाली. भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या पारड्यात मत टाकल्यानं शिवसेनेचा विजय सुकर झाला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here