जळगाव: महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होत असून महापालिकेतील घडामोडींमुळं राजकारण तापलं आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमदेवार यांच्या अर्जास भाजपनं घेतलेली हरकत पीठासीन अधिकाऱ्यांनी फेटाळल्यामुळं भाजप संतापला आहे. या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा भाजपनं दिला आहे. (Jalgaon Municipal Corporation Mayor, Deputy Mayor Election)

वाचा:

जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीला सुरुवात झाल्यानंतर उमेदवारांचे अर्ज वाचून दाखवण्यात आले. शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा अर्ज वाचून दाखविल्यानंतर सूचक आणि अनुमोदक असलेले नितीन लढ्ढा आणि प्रशांत नाईक यांचे नाव गॅझेटनुसार नसल्याचं सांगत भाजपच्या नगरसेविका अॅड. यांनी त्यावर हरकत घेतली. पिठासीन अधिकाऱ्यांना हरकत नोंद करण्याची विनंती त्यांनी केली.

वाचा:

पिठासीन अधिकाऱ्यांनी भाजपची हरकत फेटाळून लावत महाजन यांचा अर्ज वैध ठरवला. त्यामुळं हाडा संतापल्या आहेत पिठासीन अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. निवडीवरून सभागृहात जोरदार खडाजंगी सुरू आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here