मुंबई महापालिकेच्या हद्दीत दिवसभरात दोन हजार ३७७ नवीन करोना बाधिक रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळं मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाख ४९ हजार ९७४ इतकी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठे संकेत दिले आहेत. आता लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे, असं विधान किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
वाचाः
बाजारांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढत असून बाजारांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. लॉकडाऊन टाळण्यासाठी सर्व मुंबईकरांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे व नियम पाळले पाहिजेत, असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
वाचाः
बाजारांचे स्थलांतर
दादर येथील भाजी व फुल बाजार मध्यवर्ती ठिकाणी असून खरेदीसाठी लोकांची गर्दी होत असल्याने त्यामुळे हे दोन्ही बाजार बीकेसीतील एमएमआरडीए व सायन येथील सोमय्या मैदानावर हलवण्यात येणार आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times